माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे ! पीपल बाईट
पुण्याचे माजी खासदार तथा ज्येष्ठ राजकीय नेते सुरेश कलमाडी यांचे आज मंगळवारी (दि. ६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.निधनाची बातमी समजताच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी कलमाडी यांच्या निवासस्थानी गर्दी करत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित राहून कलमाडी यांच्या पार्थिवास श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.सुरेश कलमाडी यांनी लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व करताना शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. विशेषतः क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ते ओळखले जात होते. पुण्यातील क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता.कलमाडी यांच्या निधनावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच सामाजिक संस्थांनी शोक व्यक्त केला आहे. पुणे शहराने एक अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
—————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

