ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची घोषणा

  • शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रतिनिधी निश्चित; पक्षनिहाय यादी जाहीर

पिंपरी ! पीपल बाईट

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पक्षनिहाय सदस्यांची नावे समोर आली आहेत. या घोषणेनंतर महापालिकेतील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट झाले आहे. भाजपकडून एकूण ११, राष्ट्रवादीकडून चार आणि शिवसेनेकडून एका सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपकडून अभिषेक बारणे, शालिनी गुरव, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सायली गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे आणि मधुरा शिंदे यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरिता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना स्थायी समितीत संधी देण्यात आली आहे.

————————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643