सागर खांदवेंच्या उपोषणाला लोहगावकरांचा प्रतिसाद
- लोहगावमधील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराचा दोन महिन्यांत चौकशी अहवाल देऊ
- कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन
पुणे : पीपल बाईट
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोहगाव-वाघोली राज्य महामार्ग क्रमांक ६८ वरील संत नगर ते दादाची वस्ती या एक किलोमीटर रस्त्यावरील काँक्रिटीकरण कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवालाला गेली अडीच वर्षे विलंब होत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष सागर शिवाजी खांदवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एक दिवसीय उपोषणाला लोहगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
उपोषणस्थळी मोठ्या संख्येने लोहगावकरांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन येत्या दोन महिन्यांत संबंधित चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. चौकशी सुरू असताना काढलेल्या बिलांबाबत वरिष्ठ पातळीवरून पुनर्पडताळणी करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. त्यामुळे खांदवे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
या उपोषणाला युवा नेते सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने, कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू, अझरखान, प्रभाग क्रमांक दोन अध्यक्ष सुभाष ठोकळ, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस केशव रागपसरे, लोहगावचे माजी उपसरपंच सोमनाथ खांदवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख बाळासाहेब खांदवे, लोहगाव शाखा अध्यक्ष निखिल खांदवे, प्रभाग प्रमुख संजय मोझे, वरिष्ठ नेते एकनाथ खांदवे, काळुराम साठे, विलास खांदवे, शिवसेना लोहगाव शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बरोबर सनी पांडुरंग खांदवे, अक्षय खांदवे, ऋषिकेश बालघरे, ओंकार बालघरे, सवेंदू शिंदे, योगिता राखपसरे, संतोष राखपसरे आदींसह लोहगावकर उपस्थित होते.
——————————————————–
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

