देश

Rajnath Singh : ‘कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’, ट्रम्प टॅरिफवरील तणावादरम्यान राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीची जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमक्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीची जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या कर आकारणीच्या धमक्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले की, भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठी देश कोणत्याही परदेशी पुरवठ्यावर अवलंबून राहू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर लादलेल्या ५० टक्के शुल्काचा संदर्भ देत सिंग म्हणाले की, कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. ते म्हणाले, ‘कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त हितसंबंध कायम असतात. जागतिक स्तरावर, सध्या व्यापारासाठी युद्धासारखी परिस्थिती आहे.’ ते म्हणाले की, विकसित देश अधिकाधिक संरक्षणवादी होत आहेत, परंतु भारत आपल्या राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही.

राजनाथ सिंह म्हणाले की, सरकार पुढील १० वर्षांत हवाई सुरक्षा प्रणाली सुदर्शन चक्र अंतर्गत देशभरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी संपूर्ण हवाई सुरक्षा प्रदान करण्याची योजना आखत आहे. एनडीटीव्ही डिफेन्स समिटमधील आपल्या भाषणात सिंह म्हणाले की, अशी सुरक्षा व्यवस्था विकसित केली जात आहे जी शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याचे संरक्षण करण्यास आणि त्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असेल. ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण पाहिल्याप्रमाणे, आजच्या युद्धांमध्ये हवाई सुरक्षेचे महत्त्व खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत, सुदर्शन चक्र मोहीम एक मोठा गेम चेंजर ठरेल.’, असं यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.