ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदिनी धेंडे व डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी ! पीपल बाईट

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार नंदिनी सिद्धार्थ धेंडे तसेच माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ठराविक वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी शांततेत आणि उत्साहात मतदान केले.

लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मतदानानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करत, अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असेही सांगितले. प्रभागात उत्साहाचे वातावरण असून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.


बातमीसाठी संपर्क : 8329525643