पुणे – पिंपरीत दुपार पर्यंत मतदानाचा टक्का थंड
– साडेतीन वाजेपर्यंत पुण्यात ३९, पिंपरी-चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान
पुणे ! पीपल बाईट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पुणे महापालिकेसाठी ३९ टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ४०.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा उत्साह दिसून आला असला, तरी दुपारनंतर काही प्रभागांमध्ये मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेतील एकूण १६२ पदांसाठी, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची ये-जा सुरू असून, शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी मतदार यादीतील अडचणी, केंद्र शोधण्यात होणारा त्रास तसेच दुपारच्या वेळेतील उष्णतेमुळे मतदानावर परिणाम झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाने मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.
————————————
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

