ताज्या घडामोडी

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार ॲड. आम्रपाली धिवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे ! पीपल बाईट

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार ॲड. आम्रपाली धिवार यांनी आज गुरुवारी (दि. १५) कार्यकर्त्यांसह आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी शांततेत आणि उत्साहात मतदान केले.

मतदानानंतर बोलताना ॲड. आम्रपाली धिवार यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार व कर्तव्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदानाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून लोकशाहीच्या या सणात मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

————-

बातमीसाठी संपर्क : 8329525643