जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! आता २८ दिवसांचा प्लॅन फक्त ९१ रुपयांमध्ये

Jio Recharge | रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक स्वस्त व परवडणारा रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन फक्त 91 रुपयांत उपलब्ध असून त्याची वैधता 28 दिवसांची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा केवळ डेटा व्हाउचर नसून, यात कॉलिंग आणि एसएमएसचाही समावेश आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये इंटरनेटसोबतच बोलणे आणि मेसेजिंगची सोय ग्राहकांना मिळणार आहे.
या नवीन प्लॅनमुळे जिओने पुन्हा एकदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकले आहे. सध्या या दरात आणि या सुविधांसह कोणत्याही कंपनीकडे प्लॅन उपलब्ध नाही, त्यामुळे जिओ ग्राहकांसाठी ही खरोखरच दिलासादायक बातमी ठरते. (Jio Recharge)
जिओ 91 रुपयांचा प्लॅन : काय मिळणार फायदे? :
या 91 रुपयांच्या जिओफोन प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एमबी डेटा, त्यासोबत 200 एमबी अतिरिक्त बोनस डेटा मिळतो. यामुळे एकूण 3 जीबी डेटा ग्राहकांना वापरता येतो. तसेच या प्लॅनसोबत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 500 एसएमएस मोफत मिळणार आहेत. डेटा संपल्यानंतर स्पीड 64 केबीपीएसवर कमी होईल, मात्र इंटरनेट थांबणार नाही.
याशिवाय या प्लॅनसोबत जिओकडून जिओ क्लाउड स्टोरेज आणि जिओ टीव्ही या अॅप्सचा मोफत प्रवेश दिला जातो. म्हणजेच मनोरंजनासोबतच डेटा स्टोरेजची सोय देखील ग्राहकांना मिळणार आहे. मात्र हा प्लॅन फक्त जिओफोन आणि जिओफोन प्राइम सदस्यांसाठीच लागू आहे.
Jio Recharge | इतर स्वस्त जिओफोन प्लॅन्स :
91 रुपयांच्या या प्लॅन व्यतिरिक्त जिओकडे आणखी काही परवडणारे रिचार्ज पर्याय उपलब्ध आहेत. 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वैधता, दररोज 0.1 जीबी डेटा, 200 एमबी बोनस डेटा, 50 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाते. (Jio Recharge Plan)
याशिवाय जिओफोन वापरकर्त्यांसाठी 125 रुपये, 152 रुपये, 186 रुपये, 223 रुपये आणि 895 रुपये असे विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे 895 रुपयांचा प्लॅन तब्बल 336 दिवसांची वैधता देतो, त्यामुळे वर्षभराच्या रिचार्जची चिंता करण्याची गरज राहत नाही.

