पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
– पाच हजार ९२२ हरकती पैकी चार हजार ५२४ हरकती अमान्य.
पुणे ! पीपल बाईट
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली.
यापूर्वी ११ आणि १२ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. या कालावधीत नागरिक व विविध पक्षांकडून एकूण पाच हजार ९२२ हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये चार हजार ५२४ सूचना अमान्य ठरल्या असून केवळ एक हजार ३२९ सूचना मान्य झाल्या. त्यानंतर आयोगाने आवश्यक दुरुस्त्या करून अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे.नव्या आराखड्यानुसार काही प्रभागांची नावे बदलण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक १, १४, १५, १७, २०, २४, २६ आणि ३८ आदीचा त्यामध्ये समावेश आहे. निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरु झाली असून, प्रभागनिहाय मतदारसंघ निश्चित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून तळागाळातील तयारीला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या अंतिम प्रभाग रचनेनंतर उमेदवारी अर्ज, आरक्षण सोडत आणि मतदार यादीचा आराखडा जाहीर होण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. आगामी निवडणुकीत पुणे शहरातील सत्तासमीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रभागाच्या नावात बदल –
१) कळस धानोरी ऐवजी कळस – धानोरी – लोहगाव उर्वरीत.
२) कोरेगाव पार्क मुंडवा ऐवजी कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंडवा.
३) मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी ऐवजी मांजरी बुद्रुक – केशवनगर – साडेसतरा नळी.
४) रामटेकडी – माळवाडी ऐवजी रामटेकडी-माळवाडी- वैदुवाडी.
५) बिबवेवाडी – महेश सोसायटी ऐवजी शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
६) कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ ऐवजी कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम. हॉस्पिटल.
७) गुरुवार पेठ – घोरपडे पेठ ऐवजी घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभूमी.
८) आंबेगाव – कात्रज ऐवजी बालाजीनगर-आंबेगाव – कात्रज
————————–
बातमीसाठी संपर्क – 8329525643

