चळवळीचा आधारवड हरपला…
– प्राचार्य विश्वास सायानाकर यांचे निधन
सांगली ! पीपल बाईट
सांगली जिल्ह्यातील उरूण ईश्वरपूर येथील रहिवाशी. पुरोगामी संघटना विद्यार्थी चळवळीचा जनाधार मार्गदर्शक असलेले जेष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे आज मंगळवारी दिनांक 18 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उरूण ईश्वरपूर येथील चळवळीत पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
उरूण ईश्वरपूर येथेच सामाजिक चळवळीचा वारसा आहे. या चळवळींना तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मार्गदर्शन करण्यात आणि घडविण्यात सायनाकर सर यांचा मोठा वाटा आहे. गेल्या उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ते स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. सर्वसामान्य नागरिकांना वेगळा राजकीय पर्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले. जीवनात यशस्वी झाले. प्राध्यापक सामाजिक संघटनातील कार्यकर्ते यांना सतत त्यांचे मार्गदर्शन असायचे. त्यांच्या जाण्याने ही पोकळी भरून निघणार नाही अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
————————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

