ताज्या घडामोडी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

पुणे ! पीपल बाईट

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आणि निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक आज मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. शहरातील संघटन बळकट करण्यापासून ते निवडणूक मोहिमेच्या पुढील टप्प्यांपर्यंत सर्व विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. माजी आमदार सुनील टिंगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बैठकीत प्रमुख पदाधिकारी, निरीक्षक आणि विविध विभागांचे जबाबदार उपस्थित होते. सुरुवातीला सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुणे मनपाच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याने, प्रत्येक मतदारसंघात प्रभावी उपस्थिती निर्माण करण्यावर भर देण्यात आला. बूथरचना मजबूत करणे, बूथप्रमुखांची नेमणूक, घरपोच प्रचार मोहीम, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रभागनिहाय रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

त्याचप्रमाणे गेल्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना ज्या भागांमध्ये संघटना मजबूत करणे आवश्यक आहे, अशा सर्व ठिकाणी त्वरीत कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे, स्थानिक विषयांवर एकसंध भूमिका तयार करणे आणि मतदारांशी थेट संपर्क वाढवणे या गोष्टींना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचेही बैठकीत नमूद झाले.

————-

बातमीसाठी संपर्क : 8329525643