राज्यात आजपासून आचारसंहिता ?
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर होणार
मुंबई ! पीपल बाईट
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आज निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज, मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
ही पत्रकार परिषद मंत्रालयासमोरील सचिवालयातील जीमखान्यात होणार असून, यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला असल्याने या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता असल्याने प्रशासन आणि राजकीय पक्षांची हालचाल सुरू झाली आहे.
—————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

