जाहिरनामा निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक
– माजी आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्त्वात आयोजन
पुणे ! पीपल बाईट
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराचा जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीरनाम्याची रूपरेषा निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जाहिरनामा समितीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. पुणे शहर पुर्वचे अध्यक्ष माजी आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली.
या बैठकीत पुण्याच्या वाढत्या गरजा, आधुनिक शहरी आयुष्याची दिशा आणि पुढील पिढीच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार होत आहे.वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य-शिक्षण, क्रीडा-सांस्कृतिक सुविधा, उद्याने, स्मार्ट तंत्रज्ञान, महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यांसारख्या प्रमुख विषयांवर ठोस उपाययोजना यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. विशेषत: युवक आणि जेन झी पिढीच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत, रोजगार, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती, आधुनिक सार्वजनिक सेवा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शहर व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर समितीने चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्वासनांचे पान नव्हे, तर पुणेकरांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडविणारी एक जबाबदार कृती-योजना आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी हा जाहीरनामा प्रभावी ठरेल, असा विश्वास आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, अशी माहिती माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला.
——————–
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

