सांगली महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार
– आमदार जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
सांगली ! पीपल बाईट
सांगली महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा आज सोमवारी (ता. १५) होण्याची शक्यता असतानाच, महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. सांगली महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

