ताज्या घडामोडी

पूजा जाधव यांची माघार ; शीतल सावंत यांचा मार्ग मोकळा

पुणे ! पीपल बाईट पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील भाजपच्या महिला उमेदवार पूजा जाधव यांनी उमेदवारीतून माघार घेतली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या तीव्र विरोधानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पूजा जाधव या सुरुवातीला प्रभाग क्रमांक एकमधून निवडणुकीची तयारी करत होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी दिली होती.

या प्रभागात त्यांचा सामना माजी नगरसेविका शीतल सावंत यांच्याशी होणार होता. उमेदवारी बदल आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध यामुळे पूजा जाधव यांनी अखेर माघार घेतली. त्यांच्या माघारीनंतर आता प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी नगरसेविका शीतल सावंत यांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुजा जाधव सक्षम उमेदवार होत्या. त्यांनी तगडी लढत दिली असती अशी चर्चा आहे.

——————-⸻

बातमीसाठी संपर्क : 8329525643