पुणे

विराज लांडे यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक सात मधून ओबीसी प्रवर्गातून देणार लढत

पिंपरी : पीपल बाईट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक ७ (सँडवीक कॉलनी, खंडोबा माळ, लांडेवाडी) येथून विराज लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ओबीसी प्रवर्गातून त्यांनी ही उमेदवारी दाखल केली असून, मंगळवारी (दि. ३०) दुपारी सव्वा दोन वाजता त्यांनी अधिकृतपणे अर्ज सादर केला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे, नंदकुमार लांडे, प्रकाश सोमवंशी, विक्रांत लांडे यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे तसेच माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.

विराज लांडे यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असोत किंवा तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा, प्रत्येक स्तरावर त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. परिसरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, सामाजिक कार्यक्रम यामध्ये त्यांचा सहभाग सातत्याने दिसून आला आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली होती. त्यानुसार विराज लांडे यांनी ठरलेल्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रभाग क्रमांक सातमधील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया :

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संधी दिल्‍याबद्दल त्‍यांचे आभारी आहे. तसेच भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्‍वनाथ लांडे, अजित गव्‍हाणे, नंदकुमार लांडे, विक्रांत लांडे यांच्‍या मागर्दशनाने निवडणुकीला सामोरा जात आहे. प्रभागातील जनता प्रेमरुपी आशिर्वाद देईल, असा विश्‍वास आहे.

विराज विश्‍वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७.

———–

बातमीसाठी संपर्क : 99228 87861