पुणे

आयुब शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पुणे | पीपल बाईट

मुस्लिम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आयुब शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. समाजाशी असलेली घट्ट नाळ, संघटनात्मक अनुभव आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन आयुब शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अल्पसंख्यांक समाजातील प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.

या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष (पूर्व) माजी आमदार सुनील टिंगरे, अजय सावंत उपस्थित होते.

यावेळी येरवडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर भक्कम भूमिका मांडत संघटन बळकटीसाठी ते कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

————

बातमीसाठी संपर्क : 8329535643