आदिती बाबर भाजपा पुरस्कृत उमेदवार
– प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवारीवर शिक्कामोर्तब
पुणे ! पीपल बाईट
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवारीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर भाजपाने निर्णय घेतला असून अपक्ष उमेदवार आदिती बाबर यांना अधिकृतपणे भाजपा आरपीआयचा पुरस्कृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे. पॅनेल मधील इतर उमेदवारांकडून तसे सोशल मीडियावर संदेश देखील व्हायरल होत आहेत.

यापूर्वी भाजपाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पूजा जाधव यांनी पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या जागेवर भाजप कोणाला पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.
पूजा जाधव यांना पक्षाने माघार घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपाचा पुरस्कृत उमेदवार कोण असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या जागेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या आदिती बाबर यांना भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला.या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक २ मधील निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थक आता आदिती बाबर यांच्या प्रचारात सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
———————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

