ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये दहावी परीक्षेसाठी २५,७७९ विद्यार्थी

पीपल बाईट ! प्रतिनिधी ! पिंपरी

राज्य मंडळाची दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून सुरू होत असून पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ५१ केंद्रांवर एकूण २५,७७९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.महापौर रवी लांडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व शांत मनाने परीक्षा देण्याच्या शुभेच्छा दिल्या. परीक्षेदरम्यान सुरक्षित व तणावमुक्त वातावरणासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर अचानक तपासण्या होणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उपायुक्त ममता शिंदे यांनी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला असून विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.


बातमीसाठी संपर्क : 8329525643