ताज्या घडामोडी

शासकीय अधिकारी प्रवीण लोखंडे यांचा यंदाही प्रेरणादायी उपक्रम

दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्यांचा गौरव

सांगली । प्रतिनिधी 

ऐतवडे बुद्रुक परिसरात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. “समाजाचं देणं” या भावनेतून शासकीय अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी, बारावी, विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आणि व्यक्तींचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही चांगला उपक्रम दरवर्षी करत असल्याबद्दल कौतुक केले.

दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या आरुष अमर सोनताटे, केदार विनोद साळे, प्रणव जितेंद्र कांबळे, पूर्वा दिपक कांबळे, राजरत्न भाऊसाहेब कांबळे, साक्षी नितीन कांबळे आणि प्राची नितीन वीरभक्त यांचा गौरव करण्यात आला. तसेच बारावी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सोमनाथ अशोक कांबळे, ऋतुजा रमेश कांबळे, प्राची श्रीकांत कांबळे आणि रिया सुधीर कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष यश मिळविलेल्या प्रज्वल प्रभाकर कांबळे यांनी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत सांगली जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. तसेच सर्वस्वी सागर कांबळे यांनी समृद्धी बाल अंकुर परीक्षेत द्वितीय, तर मनस्वी रामदास कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल केले. विशेष प्राविण्य श्रेणीत मंदा अमर सोनताटे यांना फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल, तर नितीन वसंत वीरभक्त यांना कासेगाव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रवीण लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा संदेश दिला. गुणवंतांचा सन्मान हा केवळ गौरव नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारा दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, सागर कांबळे, प्रभाकर कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो कांबळे, श्रीपाल कांबळे, सुहानंद कांबळे, सुरज कांबळे, प्रमोद कांबळे, सूरज लोखंडे, सनी कांबळे, स्वप्नाली लोखंडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.