ताज्या घडामोडी

रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पीसीपीएल’ टी-२० स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ मे रोजी

पिंपरी । राईट अँगल 

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा माजी अतिरिक्त आयुक्त रोहीदास कोंडे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव समारंभ आणि दुसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, ३१ मे रोजी रामकृष्ण हॉटेल, रावेत येथील बीआरटी रोड परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि सचिव राजू कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी तसेच क्रिकेट संघटनात्मक पातळीवर भरीव योगदान दिल्याबद्दल रोहीदास कोंडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असणार आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दुसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२  क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात येणार आहे. या मध्ये इशा घुले, नीती अगरवाल, सहेज कौर, श्रेया तरस, ईश्वरी अवसरे, श्रेया जगदाळे, ऋतुजा गिलबिले, अभिनव देसाई, चैतन्य कोंडभार, प्रज्वल पवार यांचा समावेश आहे. 

—————————