नागपूर चाळीतील चार विद्यार्थिनींना मिळाले शैक्षणिक पालकत्व
ॲड. आम्रपाली धिवार यांचा पुढाकार ; शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत वसतिगृहासह शैक्षणिक शुल्क जमा
पुणे : पीपल बाईट
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या उदात्त हेतूने ॲड. आम्रपाली स्वप्नील धिवार यांनी चार विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
नागपूर चाळ येरवडा येथील समिक्षा शेलार, लावण्या शेलार, श्रावणी शेलार आणि काजल शेलार या चार विद्यार्थिनींच्या शिक्षणाची तसेच शैक्षणिक शुल्काची जबाबदारी ॲड. आम्रपाली धिवार यांनी स्वीकारली आहे. विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे, अशी भावना धिवार यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. योगेश गायकवाड, ॲड. कीर्तीसागर इंगळे, सामाजिक कार्यकर्ते नितीनजी कांबळे, स्वप्नील धिवार, सामाजिक कार्यकर्त्या अडसूळ, जाधव आणि केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बातमीसाठी संपर्क : 8329525643

