Maratha Reservation : काश्मीरचे 370 हटवले तर मराठा आरक्षणासाठी संविधानामध्ये बदल का नाही? खासदार संजय राऊतांची प्रश्न
Maratha Reservation : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले असून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

Maratha Reservation : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरु केले असून हजारो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ठाकरे गटाने पाठिंबा देत महायुती सरकारवर निशाणा साधला. तर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई हारणाऱ्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वाद-विवाद सुरु झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख ऐकण्याचा वेळ नव्हता, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

