ताज्या घडामोडीराजकारण

राजकीय ब्रेकिंग : निवडणुकीबाबत महाविकास आघाडी मांडणार भूमिका

थोड्याच वेळात पत्रकार परिषदेचे आयोजन

मुंबई ! पीपल बाईट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आज रविवारी (दि. 19) आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार आहे. या संदर्भात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते एकत्र येणार आहेत. या परिषदेत मतदार यादीतील घोळ, बोगस नावे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर महत्त्वाची भूमिका मांडली जाणार आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांकडून होत आहेत. अनेक मतदारांची नावे वगळली गेल्याचे आणि काही ठिकाणी बोगस नावे समाविष्ट केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने राज्य निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून घोळ दूर करण्याची मागणी केली होती.

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या मेळाव्यात देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मतदार यादीतील बोगस नावे ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत निवडणूक आयोगाला इशारा दिला होता. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या परिषदेत सर्व आघाडीतील नेते एकत्र येऊन लोकशाही टिकवण्यासाठी पारदर्शक आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेची मागणी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील निवडणूक राजकारणाचे पुढील दिशानिर्देश ठरवणारा हा आजचा पत्रकार परिषदेतून होणारा भूमिकाविषयक निर्णय ठरण्याची शक्यता आहे.

————-

बातमीसाठी संपर्क : 83295 25643