अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध : खासदार उज्वल निकम
– सुधीर वाघमोडे यांच्या पुण्यातील कॉर्नर मोबाईल शॉपीला खासदार निकम यांची भेट
पुणे : पीपल बाईट
देशात आज प्रत्येक तरुणाने मेक इन इंडियाअंतर्गत स्वतःचा व्यवसाय उभारला पाहिजे. यामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास तरी त्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कटिबद्ध असल्याचा विश्वास खासदार उज्वल निकम यांनी पुण्यात व्यक्त केला.
केंद्र सरकारने देशातील विविध वस्तूंवरील जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून पैशांची बचत होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या बाबत पुण्यातील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खासदार उज्वल निकम दाखल झाले होते. या वेळी त्यांनी सुधीर वाघमोडे यांच्या कॉर्नर मोबाईल शॉपीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
या वेळी कॉर्नर मोबाईल शॉपीचे संस्थापक सुधीर वाघमोडे यांच्याशी प्रश्नोत्तरातून त्यांनी जीएसटीमुळे नागरिकांचा वाढलेला प्रतिसाद कसा आहे हे जाणून घेतले. या बाबत बोलताना वाघमोडे म्हणाले की, जीएसटी कमी झाल्यामुळे वस्तूंवरील किंमती कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांचा कल पुर्वीपेक्षा वाढला आहे. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पैशांची बचत होत असल्याने लोकांना दिलासा मिळत आहे. मोबाईलवरील जीएसटी कमी झाला नाही. मात्र इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटी कमी झाला आहे. यामध्ये टीव्ही व इतर वस्तूंवरील कमी झाल्याचा नागरिकांना आनंद आहे.
लोकांचा खर्च भाजीपाल्यांवर अधिक व्हायचा. त्यावरील बचत होत असल्याने त्या पैशांचा उपयोग इतर ठिकाणी करता येत आहे. लोकांना ऑनलाईन शिक्षणासाठी उपयोग होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचे श्रेय देतो. कारण त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठीचा आग्रह दिला. ऑनलाईन ऐवजी नागरिक स्वतः स्थानिक दुकानात येऊन वस्तू खरेदी करत असल्याचे सुधीर वाघमोडे म्हणाले.

——————————————————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

