पीएमआरडीएचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द
पुण्यातील शासकीय मुद्रणालय विभागास पत्र
पुणे : पीपल बाईट
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारुप विकास आरखाडा अर्थात डीपी रद्दवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. न्यायालयात पीएमआरडीए प्रशासनाने रद्दबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर हा प्रश्न न्यायप्रविष्ठ होता. अखेर त्यावर अंतिम निर्णय झाला असून, पीएमआरडीएने अखेरची प्रक्रीया म्हणून शासकीय मुद्राणालय विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच, विकासकामासाठी 2015 मध्ये पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली होती. यानंतर 2021 मध्ये प्राधिकरणाने प्रारुप विकास आराखडा जाहीर केला . यावर जवळपास 67 हजार हरकती, सूचना प्राप्त झाल्या. दरम्यान, तो जाहिर होण्यापूर्वी न्यायालयाने मार्च 2023 मध्ये अंतरिम स्थगिती दिली. तसेच, जैसे थे परिस्थिती ठेवण्यासा सांगितले. दरम्यान, हे प्रकरण निकाली निघत असतानाच अखेर हा आरखाडा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएला सूचना दिली होती.
दरम्यान, न्यायालयात पीएमआरडीएने 15 जुलै दरम्यान, राज्य शासानाकडून रद्द करत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, त्यावर अंतिम निर्णय न्यालयाकडून आला नव्हता. अखेर, त्या न्यायालयाच्या आदेशानंतर पीएमआरडीएने पुढील कार्यवाही पूर्ण केली.
—————————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

