नागरी समस्यांवर अधिकारी गंभीर नाहीत : आमदार बापूसाहेब पठारे
– मतदारसंघातील मूलभूत नागरी प्रश्नाबाबत पुणे महापालिकेवर मोर्चा
पुणे ! पीपल बाईट
पुणे महापालिका प्रशासन लोहगाव, वाघोली आदीसह विविध समाविष्ठ गावांसह वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स घेते. मात्र सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नागरी समस्यांवर महापालिका अधिकारी गंभीर नाहीत, अशी टिका वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली.
वडगाव शेरी मतदारसंघातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यासह नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी आमदार पठारे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर मोर्चा आयोजित करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
आमदार पठारे म्हणाले की, वडगाव शेरी मतदारसंघात ४१ पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र त्या पुर्ण भरल्या जात नाही. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. परिणामी नागरिक लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चा घेऊन येतात. या प्रश्नांसह विविध मूलभूत मागण्या मांडण्यासाठी पुणे महापालिकेवर मोर्चा आयोजित केला. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घ्यावी, असे आवाहन आमदार पठारे यांनी केले.
मतदारसंघातील या मागण्यांसाठी मोर्चा –
– वडगाव शेरी मतदार संघात दररोज अडीच तास पाणीपुरवठा करा.
– सुरु असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण करा.
– वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा.
– राजीव गांधी रुग्णालय, कळस लोहगाव, वडगाव शेरी, खराडी येथील महापालिका रुग्णालयांमध्ये परिपूर्ण सुविधांसह उपचार व्हावेत.
– लोहगाव (उर्वरित), वाघोली या समाविष्ट गावातील ड्रेनेज व पावसाळी पाण्याच्या लाईन तातडीने पूर्ण करा.
– येरवडा जाधव नगर व नदी किनारचा भाग, कळस धानोरी, वडगाव शेरी लोहगाव या भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याने सदर कामे पूर्ण करणे.
– धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी, खराडी भागातील डीपी व आरपीतील रस्ते विकसित करणे.
– खराडी ते शिवणे रस्ता, येरवडा बिंदू माधव ठाकरे चौक, शास्त्रीनगर, विश्रांतवाडी चौक आळंदी रोड वरील पुलाची कामे पूर्ण करणे.
– पुणे महापालिकेच्या ताब्यातील उद्यानाच्या आरक्षित जागेवर उद्यान विकसित करणे.
– लोहगाव, धानोरी, वडगाव शेरी, कळस वाघोली भागातील स्मशानभूमी विकसित करणे.
– उर्वरित लोहगाव, वाघोली या समाविष्ट गावांचा विकास आराखडा तातडीने मंजूर करावा.
– महापालिका हद्दीतील मिळकत करासाठी अभय योजना राबवावी.
——————
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

