पुणे

आयुक्त शेखर सिंह यांची बदली

पिंपरी ! पीपल बाईट

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (ता. ७) आदेश जारी करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली केली आहे. त्यांची कुंभमेळा, नाशिक येथील नवीन पदावर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या आदेशानुसार, सिंह यांनी आपल्या विद्यमान पदाचा कार्यभार सोपवून नवीन पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. हा आदेश अप्‍पर मुख्य सचिव (सेवा) व्‍ही. राधा यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना पाठविण्यात आल्या आहेत.पिंपरी चिंचवड महापालिकेत १३ मार्च २०१७ रोजी भाजपची सत्ता आली. त्यानंतर २७ एप्रिल २०१७ रोजी श्रावण हर्डीकर यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. हर्डीकर यांनी तीन वर्षे ९ महिने कारभार पाहिला. त्‍यांनी तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्‍यानंतर आयुक्‍त शेखर सिंह यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे. १७ सप्टेंबर रोजी शेखर सिंह यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.


बातमीसाठी संपर्क : 8329525643