ताज्या घडामोडी

नोव्हेंबर मध्ये आरक्षण सोडत

८ ते ११ नोव्‍हेंबर दरम्‍यान आरक्षण सोडती जाहिर होणार

पुणे ! पीपल बाईट

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्‍चितीसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार ८ आणि ११ नोव्‍हेंबर रोजी आरक्षण सोडत जाहिर होणार आहे. त्‍यावर हरकती आणि सूचना प्राप्‍त करून घेतल्‍यानंतर अंतिम आरक्षण निश्‍चितीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्‍यानुसार महापालिका तर्फे आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठ्या काढल्या जातील.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता. २७) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या आरक्षण सोडतीचा प्रक्रियेतील नियोजन ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यावरुण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वरूप निश्चित होणार आहेत. काही प्रभागातील आरक्षणातही बदल होईल, अशी चर्चा आहे.

अशी असेल प्रक्रिया –

– ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत राखीव जागांची संख्या निश्चित करून मान्यता घेणे.

– ८ नोव्हेंबर रोजी सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे.

– आरक्षण सोडती ९, १० व ११ नोव्हेंबर या तीन दिवसांत पार पडणार.

– ११ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीचा निकाल आयोगाला पाठवण्याचे निर्देश.

– १७ नोव्‍हेंबर रोजी हरकती मागविण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करणे.

– २४ नोव्‍हेंबर रोजी प्रारूप हरकती व सूचना मागविणे.

– २५ नोव्‍हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत हरकती सूचनांवर निर्णय.

– दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे.

———————————

बातमीसाठी संपर्क : 8329525643