उमेदवारीची अनिश्चितता कायम; इच्छुकांची धाकधूक वाढली
– वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय चित्र
पुणे ! पीपल बाईट
वडगाव शेरी मतदारसंघात उमेदवारीची अनिश्चितता कायम असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी विविध पक्षांकडे चाचपणी करत असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी मिळेपर्यंत काही इच्छुकांनी स्वखर्चानेच प्रचाराला सुरुवात केली असून गाठीभेटी, घराघरांत संपर्क, नागरिकांना परिचयपत्र देणे अशा माध्यमांतून स्वतःची ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अंतिम यादी कधी जाहीर होणार, याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी मात्र उमेदवार निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळीच उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वडगाव शेरीतील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

