ताज्या घडामोडीराजकारण

जयंतरावांची साथ, मलगुंडे यांना ‘आनंद’

ईश्‍वरपूर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (SP) कडून उमेदवारी जाहिर

सांगली ! पी. बी. लोखंडे

आगामी निवडणुकांच्‍या पार्श्वभूमीवर ईश्वरपूर (ता. वाळवा) मधील खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ॲक्‍शन मोडवर आला आहे. आमदार जयंत पाटील यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहिर करून पहिला डाव टाकला आहे. सर्वमान्‍य असलेला चेहरा म्‍हणून आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्‍हणून जयंत पाटील यांनी नाव घोषित केले आहे.

ईश्वरपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित बैठकीत ही उमेदवारी जाहीर केली. या वेळी प्रा.शामराव पाटील,खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील,सुरेंद्र पाटील, सुभाषराव सुर्यवंशी,दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील, अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील,पिरअली पुणेकर,अरुण कांबळे,शंकरराव चव्हाण,रोझा किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव, संजय पाटील,संग्राम जाधव,दिग्विजय पाटील,सचिन कोळी,स्वरूप मोरे यांच्यासह जेष्ठ,युवक,महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्‍यात स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्‍या निवडणुकांचे पडघम वाजले आहे. प्रभाग आणि आरक्षण निश्‍चितीची प्रक्रिया पार पडली आहे. आता खरी लढाई उमेदवारीवरून होणार आहे. त्‍यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. बलाढ्य उमेदवार शोधून काढले जात आहेत. तर काही जण आहे त्‍याच उमेदवारांना आपली ताकद देत आहेत. ईश्‍वरपुर नगरपालिकेसाठी आमदार जयंत पाटील यांच्‍या विरोधकांनी नुकतीच एकत्रित येत मोट बांधली. पाटील यांच्‍या बालेकिल्‍ल्‍याला हादरे लावण्यासाठी निर्धार केला. मात्र दुसरीकडे जयंत पाटील यांच्‍या गोटात मात्र जाहिररीत्‍या कोणत्‍याच हालचाली दिसत नव्‍हत्‍या.

मात्र आज मंगळवारी (दि. 28) नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करून जयंत पाटील यांनी आपली हुकूमी चाल खेळली आहे. उमेदवारी घोषित करताना जयंत पाटील म्‍हणाले की, नगरपालिकेची निवडणूक लवकर जाहिर होईल, अशी शक्‍यता गृहित धरून. मी सर्वांची चर्चा केली. पाच ते सहा जण या पदासाठी ईच्‍छुक होते. मात्र सर्वांच्‍या सहमतीने हवाहवासा वाटणारा. अजातशत्रू. कोणाचीही कळ न काढणारा. असा माणूस आवश्‍यक होता. प्रत्‍येकाला मत द्यावे असे वाटेल असा उमेदवार आनंदराव पाटील आहे, असे जयंत पाटील म्‍हणाले.जयंत पाटील यांच्‍या या आव्‍हानाला विरोधक कसे उत्‍तर देणार हे पहावे लागणार आहे. येत्या ४-६ दिवसात निवडणूका जाहीर होतील,कामाला लागा. गेल्या ९ वर्षात या शहरात काय विकास झाला? चालू होती,ती कामे बंद कशी पडली? हे जनतेला सांगा,जनता निश्चित साथ देईल.

माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी आभार मानले.

————————–

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३