हजारोंच्या उत्स्फूर्त सहभागात ‘ग्रीन धानोरी मॅरेथॉन यशस्वी !
– पर्यावरण संवर्धन व आरोग्य जागृतीचा संदेश धानोरी–लोहगाव परिसरातील नागरिकांचा सहभाग
पुणे ! पीपल बाईट
ग्रीन धानोरी मॅरेथॉन हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. धानोरी, लोहगाव आणि कळस परिसरातील नागरिकांनी हरित उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. माता जिजाऊ प्रतिष्ठान व विविध सामाजिक संस्थांच्या प्रयत्नातून ही मॅरेथॉन अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडली.पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या हरित धाव मध्ये“एक कदम प्रगती का, एक पेड़ प्रकृति का” हे ब्रीद प्रत्यक्ष धावत नागरिकांनी साकारले.
या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे आणि विशाल टिंगरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ आणि वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.
धानोरी जकात नाका येथील भारत माता रस्त्यावरून मॅरेथॉनची सुरुवात झाली. उत्साह, जोश आणि सामाजिक भानाने नटलेला हा उपक्रम अर्णेश्वर मंदिर–धानोरी वन परिसरात यशस्वीरीत्या संपन्न झाला. नागरिकांच्या सहभागाने हरित धानोरीचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
—————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

