पुणेराजकारण

पुणे मनपा निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू

– 8 ते 18 डिसेंबर दरम्यान इच्छुक, आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचे आवाहन

पुणे ! पीपल बाईट

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहरतर्फे इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांसह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 8 ते 18 डिसेंबर या कालावधीत आपले इच्छुक उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन पक्षाचे पुणे शहर (पूर्व) अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी केले आहे.

उमेदवारीसाठी आवश्यक असलेले छापील अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक बळकटी साधण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. पक्षात उमेदवारीसाठी वाढलेली उत्सुकता पाहता या प्रक्रियेला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

——————-

बातमीसाठी संपर्क : 8329525643