संविधानाच्या रक्षणासाठी बसपा वचनबद्ध : डॉ. हुलगेश चलवादी
संविधान सन्मान रॅली’ ने वेधले पुणेकरांचे लक्ष!
पुणे ! पीपल बाईट
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील नागरिकांना विश्वातील सर्वात प्रगल्भ, सर्वसमावेशक असे संविधान देऊन जगण्याचा अधिकार दिला. सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पक्ष वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून बसपाच्या वतीने ‘संविधान सन्मान रॅली’ काढण्यात आली. याप्रसंगी डॉ.चलवादी बोलत होते. पुणे महानगर पालिका आवारात असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करीत संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करीत रॅली ची सुरुवात करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात संविधानाचे प्रास्ताविक ‘संविधान रथात’ ठेऊन महानगरपालिका ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. डेक्कन, बाजीराव रोड, टिळक रोड, लक्ष्मी रोड मार्गे चुना बाजार, पुणे कॅम्प होत ही संविधान सन्मान रॅली पुणे स्टेशन स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचली. दरम्यान संविधान रथाने समस्त पुणेकरांचे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत, मुंबई येथे २६/११ च्या दहशत वादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राष्ट्रागीताने रॅली ची सांगता झाली.तत्पूर्वी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट बसपा पदाधिकाऱ्यांनी दिली.’
संविधान सन्मान रॅली’त, अशोक गायकवाड (पुणे जिल्हाध्यक्ष), बाप्पुसाहेब कुदळे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा), प्रविण वाकोडे (महासचिव), पुणे जिल्हा प्रभारी अनिल त्रिपाठी, विजय बेद ,अरुण गायकवाड, परशुराम आरूणे, सागर जगताप, राम डावकर, गणेश खंदारे, धम्मदीप लगाडे, प्रभाकर खरात, बंशी रोकडे, पुणे जिल्हा सदस्य पी.आर गायकवाड, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र राऊत (हडपसर), मनोज कसबे (वडगावशेरी), रत्नदीप जावळे (भोसरी), शिवाजी वाघमारे (उपाध्यक्ष, वडगावशेरी) प्रामुख्याने उपस्थित होते.
————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

