आज जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार
– सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची घोषणा
पुणे | पीपल बाईट
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येणार असून आज सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचणार असून उमेदवारांची चाचपणी, युती-आघाडीबाबत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील सत्तेची चावी असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.निवडणूक प्रक्रियेतील नामांकन, छाननी, माघार आणि मतदानाची तारीख यांची माहिती आयोगाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आजपासून अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

