लोहगाव–विमाननगर परिसरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांना वेग
– पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव, माजी आमदार सुनील टिंगरे, बंडू खांदवे यांच्या उपस्थितीत पाहणी
पुणे ! पीपल बाईट
लोहगाव आणि विमाननगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या भागातील प्रमुख चौकांची पाहणी करण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे आणि पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे बंडू खांदवे उपस्थितीत होते.
पाहणी दरम्यान परिसरातील कुठे नवीन सिग्नल बसवावेत. कोणत्या रस्त्यांवर वनवेची अंमलबजावणी करावी. तसेच कोणते मार्ग अधिक कार्यक्षम करता येतील यावर चर्चा करण्यात आली. वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी तातडीने काही प्राथमिक उपाययोजना सुरू करण्याचे संकेतही या भेटीत देण्यात आले.स्थळ परीक्षणा दरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित तोडगा निघावा यासाठी खांदवे यांनीही उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली.

वाढत्या लोकसंख्येसोबत रस्त्यांवरील रहदारीत होत असलेली वाढ लक्षात घेता, नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी सुरू झालेली ही प्रक्रिया आगामी काळात निश्चितच सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करण्यात येत आहे.
—————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

