अलिबागमध्ये रसिकांसाठी ‘मंतरलेली गाणी’ची सुरेल मेजवानी
रायगड ! पीपल बाईट
अलिबाग परिसरातील संगीत प्रेमींसाठी सिंगिंग स्टार्ज कराओके’तर्फे एका सुरेल संध्याकाळचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मंतरलेली गाणी या विशेष कार्यक्रमात रसिकांना मराठी गाण्यांची सुरेल मेजवानी ऐकायला मिळणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता सँडी ज् कॉटेज, रवीकिरण हॉटेलजवळ, अलिबाग येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना सिंगिंग स्टार्स स्टुडिओचे संचालक राजू बोराडे यांची असून, निवेदन संतोष भोंडे करनार आहेत. यामध्ये माधुरी नाईक, समिधा कार्लेकर, सतीश पानसरे, स्नेहल दूधसागर, संदीप साठे आणि महेश पारे हे गायक आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. संगीताच्या या अविस्मरणीय संध्याकाळसाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—————————————————-
बातमीसाठी संपर्क : 8329525643

