ताज्या घडामोडी

ऐतवडे बुद्रुक मध्ये कर्मवीरांच्या जयंतीचा उत्सव

विद्यार्थी, मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक.

सांगली ! पीपल बाईट

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती ऐतवडे बुद्रुक मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, राजकीय – सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मिरवणूक आयोजित करून उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कर्मवीरांना अभिवादन केले.

अभिवादन करण्याकरिता आमदार सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सम्राट महाडिक, अभिजीत पाटील, जयराज पाटील, अशोक पाटील, केदार पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

यासह ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप गायकवाड, सदस्य अजिंक्य पाटील, महेश कांबळे, जगन्नाथ साळुंखे, रोहित माळी, जयश्री पाटील, दीपाली कुंभार, मनीषा शिंदे, प्रियंका शेटे, उज्वला कांबळे, वारणा बँक संचालक अरविंद बुद्रुक, प्रमोद गायकवाड,  शहाजी गायकवाड आदीसह ग्रामसेवक कोळी, अमोल गायकवाड, सौरभ पाटील, शशिकांत शेटे, कर्मवीर हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, प्रगती विद्यामंदिर, किड्स केअर प्ले ग्रुप, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

जयंती नियोजन उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, अजिंक्य पाटील, रोहित माळी, जगन्नाथ साळुंखे, सुनील खरळकर, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी सुनील पाटील, माजी रयत सेवक अर्जुन गायकवाड, सलीम जमादार व गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी केले

सकाळी साडेसात वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावर मिरवणूक पार पडली. विविध संस्थांमध्ये कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले.

——————

बातमीसाठी संपर्क : 8329525643