ताज्या घडामोडी

भोसरीत नऊ संत महंतांच्या मूळ पादुकादर्शनाचा अभूतपूर्व सोहळा

  • युवा नेते विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने आयोजन

पिंपरी ! पीपल बाईट

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भारतातील नामवंत नऊ संत, महंत व शक्तिपीठांच्या मूळ पादुका दर्शनाचा भव्य आध्यात्मिक सोहळा ‘ऊर्जास्पर्श’ आयोजित करण्यात आला आहे. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संगम असलेल्या या सोहळ्याचे आयोजन युवा नेते विराज विश्वनाथ लांडे यांनी केले आहे. भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधील दत्त मंदिर, लांडेवाडी, भोसरी येथे गुरुवारी (दि. 24) हा कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन, महाप्रसाद व सामूहिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भाविकांसाठी ही एक दुर्मिळ आणि पुण्यदायी संधी ठरणार आहे.

संत-महंतांनी समाजाला भक्ती, सेवा, त्याग, समता आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. त्यांच्या पादुका दर्शनातून आध्यात्मिक ऊर्जा, मानसिक शांती आणि जीवनाला नवी दिशा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच उद्देशाने हा कार्यक्रम होणार असून या सोहळ्यात प्रभु श्रीराम (चित्रकूट) प्रासादिक पादुका, श्री साईबाबा (शिर्डी) पादुका, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर) पादुका, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सद्गगुरु शंकर महाराज (धनकवडी) पादुका, श्री. रामदास स्वामी (सज्जनगड) आणि प.पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

प्रतिक्रिया :

समाजात अध्यात्म, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा पोहोचावी. या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नऊ संत महंत यांच्या पादुका दर्शनाचा लाभ देत आहोत, याचा आनंद आहे. पिंपरी-चिंचवडसह परिसरातील भाविकांनी या दर्शन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

  • विराज विश्वनाथ लांडे, युवा नेते. प्रभाग क्रमांक सात

——————

बातमीसाठी संपर्क : 99228 87861