विश्रांतवाडीतील शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे लालबागच्या राजाची आरती
पुणे ! प्रतिनिधी
विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोरील गणेशमंदिरात शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे उत्साहात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त व प्रतिष्ठानचे पदाधिकारी सहभागी झाले.

या कार्यक्रमात प्रशांत अवगडे, नितीन साठे, करण वाल्मिकी, राज बावरी, पंकज सदभैया आणि करण सदभैया यांच्या हस्ते लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेत गणेश सावंत, ताबीश शेख, अभिजीत जाधव, रुषभ साठे, शुभम खत्री, सौरभ वाल्मिकी, महादेव होडे, शिवा कदम, दत्ता भुंजे, प्रथमेश परब, अण्णा कदम, मंजुनाथ व इतर मित्रपरिवाराने सक्रिय सहभाग घेतला.

धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक संजय कदम तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरु संजय कदम यांनी हजेरी लावून गणेशभक्तांना मार्गदर्शन केले. आरती व सत्कार कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
बातमीसाठी संपर्क : 83295 25643

