मतदार यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊन दाखवाच : राज ठाकरे
– मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाला इशारा
मुंबई ! पीपल बाईट
यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. मतदार याद्यात बोगस मतदार घुसवून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले. निवडणूका शांत घ्यायच्या असतील तर आधी याद्या स्वच्छ करा. खऱ्या मतदारांना मतदान करू दे असेही ठाकरे म्हणाले.
मनसेचा मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा रविवारी (दि. १९) पार पडला. यावेळी ठाकरे यांनी इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, आपला आमदार निवडून येत नाही म्हणून बोलतात. मात्र ते येऊ नये म्हणून बोगस मतदान वाढवत आहेत. मग कितीही निवडणुका झाल्या तरी उपयोग नाही. मॅच फिक्स आहे. राज्यातील सर्व जमिनी अदाणी, अंबानी यांच्या घशात घालायच्या आहेत. ते मराठी म्हणून मी होऊ देणार नाही. आगामी काळात घराघरात जाऊन मतदार यादी तपासा. मतदारांनी आपला कौल कोणाला पण देऊ दे. योग्य लोकांना मते देऊ द्या. असे ठाकरे म्हणाले.
———————
बातमीसाठी संपर्क : 83295 25643

