ताज्या घडामोडी

मोफत नेत्रतपासणी शिबिराचा डोळस उपक्रम

  • सुधीर सुभाष वाघमोडे, डॉ. स्नेहा वाघमोडे यांचा पुढाकार
  • प्रभाग दोन मधील दीड हजार नागरिकांनी घेतला लाभ

पुणे ! पीपल बाईट

आमच्याकडे वेळ आणि साधने कमी.. तपासणीला जाण्याची अडचण होती.. दूरचं काय, अंगणातला नातूही नीट दिसेनासा झाला होता. पण हे शिबीर अगदी दारात आल्यासारखं वाटले. व्यवस्थित उपचार झाले. योग्य सल्ला दिला. त्यामुळे नीट दिसेल असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. देवदूत धावून आल्याची भावना जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील शांतीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, नागपूर चाळ परिसरात आयोजित नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. डॉ. स्नेहल वाघमोडे (एमडी) आणि युवा नेते सुधीर सुभाष वाघमोडे यांच्या पुढाकाराने हा डोळस उपक्रम आयोजित करण्यात आला. ए. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातील तज्ज्ञांच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय मोफत शिबिरात तब्बल एक हजार पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शनिवारी (दि. १५) आणि रविवारी (दि. १६) रोजी हे शिबीर पार पडले. या वेळी जेष्ठांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. स्नेहल वाघमोडे (एमडी) आणि युवा नेते सुधीर सुभाष वाघमोडे यांच्या वतीने मोफत ९० नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एक हजार २०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा सुमारे दीड हजार नागरिकांनी लाभ घेतला. मोफत चष्मा वितरणाच्या वेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एका वृद्ध महिलेने चष्मा घेताना भावुक होऊन म्हटले की, स्वयंसेवक धावपळ करत सर्वांची काळजी घेत होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक येणाऱ्या नागरिकाला आपुलकीने बसवून तपासणीची व्यवस्था केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टरांची टीम, स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या दोन दिवसांनी परिसरात एक वेगळाच सामाजिक वातावरण निर्माण झाले. तर एकमेकांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश दिसत होता.

—————————————————————————————————

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३