विमाननगरमध्ये वन-वे वाहतूक व्यवस्थेला सुरुवात
- रहिवासी, वाहतूक पोलिस आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशनचा पुढाकार
पुणे ! पीपल बाईट
विमाननगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, चुकीची वळणे, अनियोजित पार्किंग आणि पादचाऱ्यांची असुरक्षितता या गंभीर समस्यांचे बारकाईने विश्लेषण करून नागरिक व प्रशासनाने एकत्र येत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विमाननगर येथील रहिवासी, पुणे शहर वाहतूक पोलिस विभाग आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातून परिसरातील वन-वे (एकमार्गी) वाहतूक व्यवस्था औपचारिकरित्या सुरू करण्यात आली.

या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे शहर वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव, विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम तसेच इतर अधिकारी, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वन-वे व्यवस्था दोन मार्गांवर लागू करण्यात आली आहे. या मध्ये श्री कृष्ण चौक ते सीसीडी चौक, गंगापूरम चौक ते गणपती मंदिर चौक याचा समावेश आहे.या बदलामुळे परिसरातील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहनांची हालचाल अधिक सुरळीत होईल आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
——————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

