ताज्या घडामोडी

सागर खांदवे यांचे एकदिवसीय उपोषण ; लोहगाव – केसनंद रस्त्याच्या कामातील गैरव्यवहाराच्‍या चौकशीची मागणी

पुणे ! पीपल बाईट

लोहगाव–वाडी–केसनंद या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामातील झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्‍याच्‍या निषेधार्थ व या गैरव्‍यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील युवक अध्यक्ष सागर शिवाजी खांदवे एकदिवसीय उपोषण करणार आहेत. बुधवारी (१९ नोव्हेंबर २०२५) रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत लोहगाव येथील मुख्य बसस्थानक चौक (भक्ती-शक्ती चौक ते पुणे-४५ मार्ग) येथे ते एकदिवसीय लक्षवेधी उपोषण करणार आहेत.

खांदवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विभागाला तक्रार दिल्यानंतरही रस्त्याच्या कामातील अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली नाही. तसेच संबंधित ठेकेदाराचे तब्बल ९३ कोटी ७६ लाख २३८ कोटी रुपयांचे बिले मंजूर करून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक वेळा लेखी व मौखिक विनंती करूनही विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खांदवे यांनी प्रशासन व विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, उपोषणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही धोका पोहोचणार नाही. आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

———————-

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३