ताज्या घडामोडी

प्रभाग 3 : सागर खांदवे काँग्रेसमधून ओबीसी प्रवर्गातून लढणार

पुणे : पीपल बाईट

पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ (ओबीसी पुरुष) मधून सागर खांदवे यांची काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांना एबी (अधिकृत उमेदवारी) फॉर्म देण्यात आल्याने प्रभागातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

सागर खांदवे हे यापूर्वी आमदार बापूसाहेब पठारे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मागील काही काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्या दृष्टीने त्यांनी पक्षांतर्गत हालचालीही वाढवल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्र येणे आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची राजकीय कोंडी झाली.या घडामोडीनंतर खांदवे यांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क वाढवला. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, प्रभागातील सामाजिक संपर्क आणि ओबीसी समाजातील प्रभाव लक्षात घेता काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकत थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेसला एक मजबूत उमेदवार मिळाल्याचे मानले जात आहे.खांदवे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील लढत अधिक चुरशीची होणार असून राष्ट्रवादी आणि इतर पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणूक प्रचारात सागर खांदवे आक्रमक पद्धतीने मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

—————

बातमीसाठी संपर्क : 8329525643