पुणे इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिकेचे वाचन
पुणे । पीपल बाईट
विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी , उपाध्यक्षा ऍड. रेणुका चलवादी , प्राचार्या स्मिता लोंढे , व्यवस्थपिका सायली शिंदे ,उप प्राचार्या जयश्री कदम ,बिना कदम ,ज्योती सचदेव ,अश्विनी मोहिते सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हुलगेश चलवादी म्हणाले की विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे मूल्य, अधिकार आणि कर्तव्य यांची सुंदर जाण करून घेतली , भारताच्या संविधानातील प्रत्येक शब्द मुलांच्या मनात स्वातंत्र्य, समता आणि आपुलकीची बीजं रोवतो आणि हेच मूल्य उज्ज्वल भविष्याची पायरी ठरतात .
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच२६/११ तील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
——————————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

