पुणे महापालिका निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीची घोषणा
पुणे ! पीपल बाईट
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराने जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीरनाम्याची रूपरेषा निश्चित होत असून, त्यासाठी अधिकृत जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शहराध्यक्ष तथा माजी आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
या समितीत 14 जणांची निवड करण्यात आली. या मध्ये सुनिल टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे पाटील, दीपक मानकर, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दत्तात्रय धकनवडे, दिलीप बारटे, बाबुराव चांदरे, बाळासाहेब बोढगे, शंकर केमसे, प्रदिप गायकर, निलेश मगर आणि सुनील गायकवाड आदींचा समावेश आहे.
पुणेकरांच्या गरजा आणि पुढील पिढीच्या अपेक्षा लक्षात घेताना वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट तंत्रज्ञान, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी खास उपक्रम या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देणारा जाहीरनामा तयार केला जाणार आहे. जेन झीच्या गरजांना अनुरूप ठोस आणि अंमलात आणता येणाऱ्या योजना यात समाविष्ट होतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.
————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

