प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
– प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वड्डेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
पुणे ! पीपल बाईट
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. शुक्रवारी (दि. २६) पुण्यात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी, तसेच दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रशांत जगताप यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील स्पष्ट दिशा, संघटनात्मक भूमिका याबाबत मतभेद वाढत गेल्याने त्यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
——————–
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

