ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रज्वल कांबळे प्रथम

सांगली । प्रदीप लोखंडे 

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) येथील अरिहंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२५-२६ मध्ये प्रज्वल प्रभाकर कांबळे याने तब्बल २३८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकालातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. पार्श्वनाथ तात्यासो पाटील याने २०० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. आयुष देसाई याने १८० गुण, ऋतुजा नांगरे याने १७६ गुण, अभिराज पोर्लेकर याने १६२ गुण, श्रद्धा विजय पवार हिने १५४ गुण, हर्षवर्धन तिकोटी हिने १३८ गुण तर वेदांत माने याने १२८ गुण मिळवत यश संपादन केले.

प्रज्वल कांबळे विविध परीक्षेत यश मिळवित आपल्या नावलौकिकात भर घालत आहे. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. त्याने ३०० गुणांपैकी २३८ गुण मिळवत हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक, अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, समाज बांधव तसेच पालक वर्गातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

———————-