ताज्या घडामोडी

प्रभाग दोन मध्ये फराळ वाटपातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा 20 वर्षे उपक्रम.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रभागातील नागरिक, कर्मचारी यांचा सन्मान

पुणे ! पीपल बाईट

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसामान्य नागरिकांना फराळ वाटप कार्यक्रम पार पडला. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिक कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या नागरी समस्यांवर वर्षभर पाठपुरावा करून त्यांचे निवारण करण्याबरोबरच दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटावा, या उद्देशाने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे सलग २० वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत.

या प्रसंगी आमदार बापू पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे, नानासाहेब नलावडे, शिवाजीराव ठोंबरे, दिलीप म्हस्के, नामदेव घाडगे, यशवंत शिर्के, राजकुमार बाफना, गणेश बाबर, राहुल जाधव, सुधीर वाघमोडे, योगीता शिर्के, अदिती बाबर, महेश शिर्के, प्रकाश आम्रे, रजनी वाघमारे, लक्ष्मी डोक्रस, मंगल गमरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रभागातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, सर्वसामान्यांना आधार देणारे नेतृत्व कायमस्वरूपी टिकते. डॉ. धेंडे यांनी प्रभागात केलेली विकास कामे पाहता लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास दिसत आहे. त्यामुळे ते तीन वेळा या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माझी दुसरी टर्म असताना डॉ. धेंडे यांची पहिली तर निवडून येण्याची होती. चांगल्या लोकांनी सातत्याने प्रभागाची प्रतिनिधित्व केले पाहिजे. डॉ. धेंडे आणि मी पाठपुरावा करत चंद्रमानगर येथील रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावला. त्या ठिकाणी नागरिकांना हक्काच्या जमिनी मिळवून देत त्यांना हक्काचा निवारा आमच्या पाठपुराव्यामुळे मिळाला.

माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले की, दिवाळी हा पवित्र उत्सव आहे. या उत्सवाची दरवर्षी आपण आतुरतेने वाट पाहत असतो. अशा सणावेळी केवळ आपलीच दिवाळी प्रकाशमय न करता सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी प्रकाशमय करण्याचा उपक्रम डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी घेतला. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

मंगेश गोळे म्हणाले की, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना पक्षाने उपमहापौर पदी संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. या काळात चांगले निर्णय त्यांनी घेतले.

प्रतिक्रिया :

सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्या आयुष्यात सणानिमित्त आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम सलग २० वर्षे मी राबवित आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनता आपल्यावर विश्वास टाकत आहे. हा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी या नात्याने असा उपक्रम राबवण्याचे समाधान आहे. यानिमित्त विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे सेवा बजावणाऱ्या महावितरण कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सकाळी कामगार यांच्यासह विविध नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.


बातमीसाठी संपर्क. : 8329525643